सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : वडगाव निंबाळकर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विधान सभा क्षेत्र प्रमूख निलेश मदने यांच्या वाढदवसानिमित्त वडगांव निंबाळकर येथे नीलेश मदने युवा प्रतिष्ठान व शिवसेना शाखा वडगांव निंबाळकर यांच्या वतीने वडगांव निंबाळकर येथे भव्य आरोग्य शिबिर, डोळे तपासणी, संजय गांधी निराधार योजना फॉर्म वाटप , व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी वडगांव निंबाळकर येथील व परिसरातील महिला व नागरिकांनी या ठिकाणी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत सदर विविध योजनांचा लाभ घेतला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्र्वास मांढरे, विधानसभा क्षेत्र प्रमूख निलेश मदने, उप तालुका प्रमुख मंगेश खताळ, उप तालुका प्रमुख सुदाम गायकवाड , विभाग प्रमुख राकेश गायकवाड, विभाग प्रमुख रंगा निकम, वडगांव निंबाळकर चे शाखा प्रमुख नितीन गायकवाड , उप शाखा प्रमुख गणेश पाटोळे महिला आघाडी बारामती उप संघटीका चव्हाण ताई व परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते
COMMENTS