पुणे जिल्हा बँकेकडून 'सोमेश्वर'च्या बँक प्रतिनिधीसाठी 'या' नावाची शिफारस : उद्या होणार शिक्कामोर्तब

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बँक प्रतिनिधी पदासाठी संभाजी नारायण होळकर यांची शिफारस करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्हा बँकेने कारखान्याला पत्र पाठवून तसे कळविण्यात आले आहे. 
              उद्या दि २९ रोजी सकाळी १० वाजता संचालक मंडळाच्या सभेत या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.  बँकेने सोमेश्वर कारखान्याला पाठविलेल्या पत्रात म्हणटले आहे की,
बँकेच्या संचालक मंडळाच्या दि. २१.१.२०२२ रोजी झालेल्या सभेतील ठराव क्रमांक ९ नुसार आपल्या संस्थेच्या संचालक मंडळावर / व्यवस्थापक समितीवर बँक प्रतिनिधी म्हणून संभाजी नारायण होळकर, संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या / व्यवस्थापक समितीच्या सभेची निमंत्रण पत्रिका, वृत्तांत इ. कागदपत्रे बँक प्रतिनिधी यांना त्यांच्या खालील पत्त्यावर पाठविण्यात यावेत. पुढील वर्षाकरिता अन्य प्रतिनिधीचे नाव कळवेपर्यंत संभाजी नारायण होळकर, संचालक हे बँकेचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील. या बँकेचे प्रतिनिधी आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या अथवा व्यवस्थापक समितीच्या सभांना हजर राहण्याबद्दल आपल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे प्रवास व इतर भत्ते तसेच सभा भत्ता मिळण्यास पात्र आहेत व त्यानुसार जरूर ती कार्यवाही करावी.
To Top