सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका आजी माजी सैनिक सोमेश्वरनगर येथे सैनिक दिवस साजरा करणेत आला .
करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली व सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,गणेश आळंदीकर ,ऑन ड्युटी जवान कुंभार व गायकवाडवस्ती व्हॉलीबॉल संघाचे युवक यावेळी हजर होते सैनिक दिनाची पार्श्वभूमी बाबत बोलताना गणेश आळंदीकर म्हणाले १५ जानेवारी १९४९ रोजी फिल्ड मार्शल जनरल करीअप्पा यानी ब्रिटीश सैन्याचे कमांडर ईन चीफ कडुन ईंडीयन आर्मी ची सुत्रे हाती घेतली तेव्हापासून हा दिवस सैनिक दिन म्हणुन साजरा केला जातो.सरपंच वैभव गायकवाड यानी सैनिक संघटनेच्या कार्याचे कौतुक करुन सैनिकामुळे देश सुरक्षीत असुन तरुणानी देशसेवेत गेले पाहीजे असे सांगीतले . बाळासाहेब शेंडकर यानी आभार मानले. यावेळी हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले जनरल बिपीन रावत व त्यांची पत्नी तसेच सर्व शहिद याना श्रद्धांजली वाहणेत आली .
COMMENTS