सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य बारामती तालुका अध्यक्षपदी फार्मासिस्ट मकरंद माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी सोलापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची धडपड चालू होती व करोना काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत यांनी आपले कर्तव्य बजावले आहे त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पंकज चौधरी, प्रदेश सचिव रोहित वाघ व प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण प्रदेश सहसचिव महादेव मुंडे व पुणे जिल्हाध्यक्ष पंकज पाटील यांच्या शिफारशीनुसार व सर्वांच्या एकमताने त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
ही निवड होताच त्यांच्यावर विविध शैक्षणिक,अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.
फार्मासिस्ट महेश मराठे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ अमित पानस्कर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पुणे विभाग प्रमुख डॉक्टर अतुल बारवकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित पोंदकुले पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सूर्यवंशी पुणे जिल्हा सचिव प्रदीप निकम ज्ञानेश्वर पायघन विदर्भ विभाग अध्यक्ष, डॉ विठ्ठल चोपडे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल सरडे जिल्हा प्रमुख सोलापूर यांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
येणाऱ्या काळा मध्ये सोलापूर जिल्हा नाहीतर पूर्ण महाराष्ट्र मध्ये फार्मासिस्टच्या येणार्या विविध अडचणी फार्मासिस्ट मकरंद माने हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS