सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात ७३ वा प्रजासत्ताक दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत कोणत्याही प्रकारचे उपक्रम न राबविता साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी भोर येथील तहसील कार्यालयासमोर राजेंद्र कचरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक नारायण कारळे यांचा सन्मान केला गेला.कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार सचिन पाटील,पोलीस निरुक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.याबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावागावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालयांच्या समोर मान्यवरांच्या हस्ते गर्दी न करता ध्वजारोहण करण्यात आले.ग्रामीण भागात गावचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य शाळेचे मुख्याध्यापक,उपशिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
COMMENTS