भोर ! जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ देणार नाही : आमदार संग्राम थोपटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची तसेच सर्वसामान्य नागरिकांची हक्काची बँक आहे.जिल्हा बँकेच्या भोर तालुक्यातील सर्व शाखांमध्ये उल्लेखनीय कामकाज केले जाते.पुढील काळात बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होऊ देणार नाही असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
            पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालकपदी आमदार संग्राम थोपटे यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा बँकेच्या भोर तालुक्यातील अधिकारी,कर्मचारी व सचिव यांच्या वतीने आमदार थोपटे यांचा सत्कार शुक्रवार दि-२८ करण्यात आला. यावेळी आमदार थोपटे बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन मुकुंद थोपटे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती रोहन भाठे ,विभागीय अधिकारी सुदाम पवार, वसुली अधिकारी विनोद काकडे, आबा भोसले,सत्यवान आवाळे,शाखा व्यवस्थापक सचिन जेधे,माजी अधिकारी वसंत किंद्रे आदींसह बँक अधिकारी ,कर्मचारी तसेच सचिव उपस्थित होते.


      
To Top