सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील भोलावडे गावचे सुपुत्र राजगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व संत रोहिदास पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन राजेश बबनराव काळे वय-५१ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
राजेश काळे हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.तसेच आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थकही होते.काळे यांनी आपल्या राजकीय कारकीर्तित अनेक नवनवीन समामाजीक उपक्रम राबवून तालुक्यात अल्पकालावधीत नावलौकिक मिळविले.काळे यांच्या जाण्याने भोलावडे गावावर तसेच तालुक्यातील काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
COMMENTS