सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : तुषार धुमाळ
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील सरपंच सुनील ढोले यांच्याविरुद्ध अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी होत असतात त्यांचे कारण म्हणजे त्यांचा मनमानी कारभार..२६जानेवारी रोजी घडलेला हा प्रकार करोना काळात सरकारी नियमानुसार ऑनलाइन सभा घेण्यात आली परंतु या सभा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला.
ग्रामस्थांच्या तक्रारीचे योग्य ते निवांरण झाली नाही.म्हूणन काही अडचणी व तंटामुक्ती अध्यक्ष निवड यावर थेट सरपंचशी ग्रामपंचायत कार्यालय भेटून चर्चा करण्यात आली. परंतु अर्जदार यांच्या मध्ये चांगलीच चढा-ओढ असताना सरपंच यांनी जमलेल्या ग्रामस्थांना व उमेदवारांना 2 ऑक्टोबर या दिवशी अध्यक्षपदाची निवड होईल असे सांगितले. व ग्रामस्थ व उमेदवारांना घरी जाण्यास सांगितले. परंतु सरपंचांनी वैयक्तिक मना- मानी निर्णय घेऊन अर्जदार उपस्थित नसतानाही, ग्रामस्थ उपस्थित नसतानाही अध्यक्षपदाची सरपंच निवड केली. तेही ग्रामपंचायत कार्यालय नाहीतर चक्क सरपंचांच्या घरी ही निवड करण्यात आली.कार्यलहीन वेळ संपल्यावर ना ग्रामस्थांचे म्हणणे ना अर्जदारांचे म्हणणे थेट सरपंच यांनी निर्णय घेतला. याविरुद्ध गावातील समस्त ग्रामस्थांनी यांचा निषेध केला आहे व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मागणी केली आहे.की लवकरात लवकर सरपंचांनी मनमानी कारभार थांबवावा फेर निवड व्हावी याची मागणी ग्रामस्त व उमेदवार यांनी केली आहे.
COMMENTS