सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरात अखिल वेताळ पेठ भोर व रुद्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री लोकनेते अनंतराव थोपटे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात ८२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यात महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग होता.
रक्तदान हे श्रेष्ठदान समजून रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.आयोजकांकडून रक्तदात्यास दुचाकी प्रवासातील सुरक्षेसाठी हेल्मेट भेट देण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष निर्मलाताई आवारे,उपनगराध्यक्ष अमित सागळे,माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्नस्कर,नगरसेविका अमृता बहिरट,नगरसेवक देविदास गायकवाड ,नगरसेवक सुमंत शेटे,नगरसेवक अण्णा मळेकर,फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत बहिरट, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बहिरट,आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.