सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याची रामराजे सोसायटीची आगळीवेगळी प्रथा असल्याचे मत पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनी व्यक्त केले.
वाणेवाडी ता बारामती येथे रामराजे सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा रामराजे जगताप स्मृती गौरव पुरस्कार बाळकृष्ण भापकर यांना देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रत येळे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संचालक कौस्तुभ चव्हाण, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी संचालक किशोर भोसले, सरपंच स्मिता काकडे, पोपटराव भोसले, विक्रम भोसले, बाबासो भोसले, उत्तमराव भोसले, दिग्विजय जगताप उपस्थित होते. होळकर पुढे म्हणाले, रामराजे सोसायटी ही नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबीरे, कोविड सेंटर तसेच सभादांच्या आर्थिक बाबी संदर्भात अडचणी सोडवण्याचे काम रामराजे सोसायटी करत असते असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात जिल्हा बँकेवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल संभाजी होळकर व दत्तात्रय येळे तसेच मुख्यध्यापक संदीप जगताप, व ऋषीकेश जेधे यांचे विशेष सत्कार करण्यात आले.त्याचबरोबर संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले तसेच संस्थेने 2022 च्या दिनदर्शिका प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना बाळकृष्ण भापकर म्हणाले, मंदिरात देव नसतो देव दारात असतो, आपण दिलेली मदत पुजाऱ्याच्या हातात जाते. कोणतेही गोष्ट आपण बुवा बाबांनी सांगितले की स्वीकारतो. त्यासाठी स्वतः विचार करायला शिका देवाला नवस करून काही होत नाही. नवस बोलून काही मिळत असते तर नवस बोलून दुसऱ्या देशाच्या सैन्यांना हरवता आले असते.
सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, रामराजे सोसायटी ही दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिरे, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याचे काम केलं जाते त्याच बरोबर सभासदांच्या इतर अडचणी अथवा कर्जा संबंधित अडचणी सोडवण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र जगताप यांनी केले तर
सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी केले.
COMMENTS