महाबळेश्वर गारठले ! पारा शून्य अंश सेल्सिअस वर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचा पारा शून्य अंश सेल्सिअस वर आल्याने महाबळेश्वर येथील वेण्णा लेक  लिंगमाला परिसरात  हिम कण साठलेले चित्र आज पाहायला मिळाले. 
    वेण्णा लेक वर असणाऱ्या बोटीच्या टपावर , या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांवर तसेच स्ट्रॉबेरी च्या झाडांवर हे हिम कण साठले होते .
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध  आहे. या ठिकाणची गुलाबी थंडी ही पर्यटकांना कायम आकर्षित करत असते  या थंडी चा आनंद  येथे येणारे पर्यटक कायम अनुभवत असतात . जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात महाबळेश्वर चा पारा कमीकमी होत आज तो शून्य अंशा वर पोहचल्याने या परिसरात कडाक्याची थंडी पडल्याने या परिसरतील नागरिक  शेकोटी पेटवून शेकताना  दिसत  होते.
To Top