सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय अधिकारी ह्या गावातील गाई भरायच्या मात्र त्याच गाई पून्हा खाजगी डॉक्टरांकडून तपासल्या तर त्या खाली निघायच्या? त्या महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सेवेला वैतागून शेंडकरवाडी ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे व बारामतीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे त्या महिला अधिकाऱ्याची बदली करण्यासंदर्भात धाव घेतली आहे.
शेंडकरवाडीचे ग्रामस्थ सोनलकुमार शेंडकर, शिवाजी माणिक शेंडकर, शिवाजी बाळासो शेंडकर, प्रदीप शेंडकर, सूर्यकांत शेंडकर, दादासो चौधरी, अभिषेक शेंडकर, अरविंद शेंडकर, बुवासो शेंडकर, महेश शेंडकर, बाळासो शेंडकर, सुरेश शेंडकर, हनुमंत शेंडकर, विकास शेंडकर व महेश शेंडकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अर्जात म्हंटले आहे की,
आमच्या गावातील पशुवैद्यकीय अधिकारी रुपाली जाधव आपल्या कामात कामचुकार पणी करत आहेत व चुकीच्या पध्दतीने सेवा देत आहेत. सिमेन्स भरलेल्या गायी त्यांनी तपासल्यानंतर गाय लागवड आहे असे सांगुन ग्रामस्थांना चुकीची माहिती देत आहेत व त्या गायी सात ते आठ महिन्यांनी खाजगी डॉक्टरांकडुन तपासल्या नंतर खाली निघत आहेत व अश्या त्यांच्या विरोधात गावातल्या बऱ्याच तक्रारी आहेत तरी आपण त्यांची बदली करावी व आम्हाला नवीन पशुवैद्यकीय अधिकारी नेमणुक करावा. यांच्या बेजबाबदार पध्दतीमुळे ग्रामस्थ आर्थिक बाबतीत अडचणीत आले आहेत.
COMMENTS