सोमेश्वर रिपोर्टर टिम- - - -
नवी दिल्ली दि १३
NDTV साठी काम करणारे उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. खान यांनी शुक्रवारी सकाळी लखनौ येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कमाल खान लखनऊमध्ये बटलर पॅलेस येथील सरकारी बंगल्यात कुटुंबासह राहत होते.
सोशल मीडियावर लोक कमाल खान यांना श्रद्धांजली वाहात आहेत. पत्रकार आलोक पांडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'खूप दुःखाने कळावे लागते की कमाल खान यांचे आज सकाळी निधन झाले आहे .
COMMENTS