आरं सणाचा बाजार हाय...कोरोना काय करत नाय ...! करंजेपुलच्या आठवडे बाजारात खरेदीसाठी लोंढा

Pune Reporter

तुषार धुमाळ - विशेष प्रतिनिधी  
बारामती दि ११

देशामध्ये आणि राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत होत असून ओमायक्रॉन  नवीन वेरिएंटचा ही धोका वाढत आहे . राज्य सरकार कडुन कडक निर्बंध लावले जात आहेत .गर्दीवर नियंत्रण राहावे आणि रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे  .रात्रीचा नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे  .

पण या सर्व निर्बंधांचे पायमल्ली होत असताना ग्रामीण भागातून दिसून येत आहे  बारामती तालुक्यातील करंजेपुल येते दि ११ मंगळवार रोजी आठवडे बाजार भरला आहे  .दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीच्या सणाच्या खरेदीनिमित्त या आठवडी बाजारामध्ये तोबा गर्दी पाहावयास मिळात आहे.खरीददार  आणि विक्रेत्यांची झुंबड उडालेली पहावयास मिळत होती .आरं सणाचा बाजार हाय...कोरोना काय करत नाय ...! असे अनेकजण बोलताना दिसून येत होते  .त्यामुळे सणासुदीसाठी तरी तूर्तास कोरोना संक्रमणाने सुट्टी घेतलेली दिसत आहे  !

वाहतूक कोंडी आणि पोलिसांचे  नियंत्रण . . .  
करंजेपूल येथे आठवडेबाजार सणानिमित्त झालेली खरेदीदार आणि विक्रेत्यांची गर्दी त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी पाहावयास मिळाली बाजारात आलेल्या नागरिकांची वाहने त्याचबरोबर ऊस वाहतूक करणारी वाहने व इतर अवजड वाहने यामुळे काही काळ सोमेश्वर मंदिर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पण वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वाहतूक शाखेने तात्काळ  नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली  .
 गर्दीवर कोण आणणार नियंत्रण ?
  करंजेपूल येथे भरलेल्या आठवडी बाजारामध्ये झालेल्या  वाहतूककोंडीवर पोलिसांनी  तात्काळ नियंत्रण मिळवले पण बाजारामध्ये होत असलेली नागरिकांची गर्दी यावरती परिसरामध्ये चर्चा रंगली आहे . आज तालुक्यामध्ये ४५ जणांचे कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह आली आहेत. त्यामुळे एकीकडे तालुक्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ही गर्दी धोकादायक आहे यावरती कोण नियंत्रण आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
To Top