बारामती ! सोमेश्वर कारखान्याच्या कामगार संचालक पदासाठी रस्सीखेच : दोन्ही कामगार संघटनेचा पदावर दावा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यलक्षी(कामगार संचालक) पदी तात्यासाहेब काळे प्रणित बारामती तालुका साखर कामगार सभेला प्रतिनिधित्व देत कामगार संचालक पद मिळावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना निवेदन देण्यात आले असून कामगार संचालक पदी तानाजी आण्णासो सोरटे यांची निवड करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र तावरे, कामगार संचालक बाळासाहेब काकडे, बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची भेट ही मागणी केली आहे.दरम्यान ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप यांच्या कामगार संघटनेच्या वतीने मुरूम येथील रमेशराव जगताप यांची निवड करावी अशी मागणी केली आहे. दोन्हीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मागील पंचवार्षिक मध्ये संचालकपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये सुरूवातीस रमेश भगत, बाळासाहेब गायकवाड, रंगराव जगताप आणि बाळासाहेब काकडे आदी पदाधिकाऱ्यांना दोन्ही संघटनेने प्रतिनिधित्व दिले होते. मात्र सुरुवातीला बारामती तालुका साखर कामगार सभेच्या प्रतिनिधीला संधी मिळावी अशी मागणी आम्ही संचालकमंडळाकडे केली आहे. कारखान्याच्या निवडणुकीनंतर सुरुवातीला तुकाराम जगताप यांच्या संघटनेला संचालकपद मिळाले होते त्यामुळे मागील इतिहास पाहता आमच्या संघटनेला संचालक पद मिळावे अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप यांच्या संघटनेने केली आहे. 
To Top