मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्ट टीम  - --
नवी दिल्ली  दि १२
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून देत म्हटलं आहे की, मी आज सौम्य लक्षणांसह करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. सध्या मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला विलग करावे आणि चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
To Top