भोर ! लोकनेते अनंतराव थोपटे यांचा ८९ वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न : क्रांती पर्व पुस्तकाचे प्रकाशन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सोनेरी पान म्हणून ओळखले जाणारे लोकनेते अनंतराव थोपटे साहेबांचा ८९ वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी क्रांतीपर्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 
       राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या सभागृहात मंगळवार दि. ११ रोजी राज्याचे माजी मंञी राजगड ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  अनंतराव थोपटे साहेब यांचा अनंतराव थोपटे गौरव समितीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी थोपटे साहेबाच्या सुवर्ण महोत्सवी राजकीय कारकीर्द  या समाजोन्नतीचा ध्यास क्रांतीपर्व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.तर थोपटे साहेबांना मानपञ देऊन त्याचा गौरव करण्यात आला.अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न कुमार देशमुंख , डी फार्माशिचे  राजकुमार  शेटे , स्मिता काळे , माजी नगरसेवक अनिल सोंडकर ,  तात्याराव जेटीथोर , राजगड ज्ञानपीठचे विश्वस्त पंढरीनाथ भिलारे , गोंविद थोपटे , कृष्णाजी शिनगारे ,डाँ. रोहिदास  जाधव, एकनाथ ओंबळे ,पंढरीनाथ उल्हाळकर ,शिक्षण संस्थेचे प्राचार्य , मुख्याध्यापक , शिक्षक , पञकार उपस्थित होते.                 

To Top