सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
सुपे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यावर सुपे पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आहे.
काल रात्री सुपे पोलिसांनी सुपे मार्केट कमिटी शेजारी असणाऱ्या शिल्पा बजरंग मारवाडी कुंभार वय 26 मूळ राहणार भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे यांच्यावर कारवाई करून 7 लीटर गावठी हातभट्टी दारु जप्त केली तर दुसऱ्या कारवाईत पूजा गार्डन मंगल कार्यालयासमोर मच्छिंद्र दत्तात्रय काळखैरे रा. काळखैरेवाडी ता बारामती जिल्हा पुणे यांच्या वर कारवाई करत बेकायदेशीर विकत असलेल्या काही देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली या कारवाईमुळे नागरीकांनी समाधान व्यक्त करत पोलिस प्रशासनाने आभार मानले आहेत सदरची कारवाई ही वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी केली असून यावेळी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रवींद्र मोहरकर, पोलिस हवालदार भाऊसाहेब शेंडगे, पोलिस नाईक अक्षय सिताप, महीला पोलिस नाईक झणझणे मॅडम उपस्थित होते.
COMMENTS