सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि-११ भाजरपेठेत भरणारा आठवडे बाजार बंद असल्याचे भोर नगरपालिका मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितली.
देशासह राज्यात, जिह्यात तसेच भोर तालुक्यात कोरोनाने कहर केल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.तालुक्यात सद्या रुग्ण असून दिवसाला ४ ते ५ रुग्ण वाढत आहेत.नागरिक बेजबाबदारपणे वागत असून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याने तसेच शासनाच्या नियमांनुसार गर्दी होऊ नये व रुग्ण संख्या वाढू नये यासाठी आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.नागरिकांनी सहकार्य करून नियमांचे पालन करावे व स्वतःची काळजी स्वतःच घेऊन कोरोनापासून दूर रहावे असेही आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
COMMENTS