सोमेश्वर रिपोर्टर टीम----- बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या ऋषिकेश राजेंद्र मोरे याला सन २०२०-२१ या वर्षी दिल्या जाणाऱ्या NMMS (सारथी) शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.
या योजनेअंतर्गत त्याला वर्षाला दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच याच विद्यार्थ्याने इ.८ वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत तालुका स्तर ( ग्रामीण विभाग) मध्ये गुणवत्ता यादीतही प्रथम स्थान मिळवले आहे.
असे दुहेरी यश प्राप्त केलेल्या गुणवान विद्यार्थ्याचे आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव भापकर, सचिव बाळकृष्ण भापकर, सहसचिव विजयसिंह भापकर, विद्यालयाचे प्राचार्य .संदीप जगताप व ग्रामस्थ आणि पालक यांनी केले.
COMMENTS