सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक स्वीकृत, एक तज्ञ, एक बँक प्रतिनिधी व एका कामगार संचालकांची निवड उद्या शनिवार दि २९ रोजी सकाळी ठीक १० वाजता पार पडणार आहे.
तत्पूर्वीच जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून संभाजी होळकर यांची निवड निश्चित झाली आहे. तर कामगार संचालक पदासाठी रमेश जगताप व तानाजी सोरटे यांनी मागणी केली आहे. तर स्वीकृत व तज्ञ संचालक या दोन पदासाठी निवडणुकीत अर्ज दाखल केलेले सर्वच उमेदवार इच्छुक असलेले तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार व तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचेकडे तब्बल ३२ जणांनी अर्ज करत संचालक पदाची मागणी केली असल्याचे विश्वनिय सूत्रांकडून समजत आहे. असे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार जे नाव सुचवतील त्यानांच संचालकपदाची संधी मिळणार आहे. नक्की संचालक पदाची 'माळ' कोणाच्या गळ्यात पडणार हे उद्या दि २९ रोजी सकाळी १० वाजता स्पष्ट होणार आहे. नक्की संचालकपदी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS