सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी तुषार सुरेशराव माहुरकर, तज्ञ संचालकपदी अजय नथुराम कदम तर बँक प्रतिनिधी म्हणून संभाजी होळकर यांची निवड करण्यात आली आहे.
आज सोमेश्वर कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचविलेल्या अजय कदम व तुषार माहुरकर यांच्या नावांची घोषणा केली. मात्र ही निवड एक वर्षासाठी असणार आहे.
COMMENTS