बारामती ! 'निंबुत'च्या लेकीचा अमेरिकेत डंका : वॉशिंग्टन येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील व अमेरिका येथे स्थायिक असणाऱ्या रितिका राहुल काकडे हिने अमेरिका वॉशिंग्टन येथे पार पडलेल्या १४ वर्ष वयोगटातील ६५ किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 
निंबुत येथील राहुल रत्नसिंह काकडे  कामानिमित्ताने अमेरिकेतील वॉशिटन येथे रहिवाशी आहेत.  दि. २९ जानेवारी रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत १४वर्ष वयोगटात ६५ किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून वॉशिंग्टन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. 
To Top