सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! गुळुंचेच्या तलाठ्यांच्या विरोधात बिनबुडाची तक्रार

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
गुळुंचे (ता.पुरंदर) येथील गावकामागर तलाठी गणेश महाजन यांनी बेकायदा पंचनामे केल्याची तक्रार गावातील काहीजणांनी तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याकडे केली आहे. परंतु, गुळुंचे गावच्या गावकारभाऱ्यांना चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वावडे असून नियमाप्रमाणे काम करणाऱ्या तलाठ्यांवर बेकायदा तक्रार करण्यात आली असून संबंधित तक्रारदार यांचे विरोधात सरकारी नियमात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३ अन्वये गुन्हे नोंद करण्याची मागणी अक्षय निगडे यांनी केली आहे.

    गावातील मतदार यादी सदोष असल्याप्रकरणी अक्षय निगडे व नितीन निगडे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्या न्यायालयात संबंधित बीएलओ यांच्याविरोधात गुन्हे नोंद प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू होती. त्यानंतर अक्षय निगडे व नितीन निगडे यांनी गावातील दुबार व बोगस नावे असलेल्या मतदारांची नावे कमी करण्याबाबत नमुना ७ चा अर्ज भरून तहसीलदार पुरंदर यांच्याकडे दाद मागितली. यानंतर  गावकामागर तलाठी गणेश महाजन यांनी संबंधित प्रकरणाची सुनावणी घेऊन पंचनामे व्यवस्थित रित्या पूर्ण केले. मात्र, याच पंचनाम्यांच्यावर आक्षेप घेत गावातील काही जणांनी गाव कामगार तलाठी यांच्याविरोधात आक्षेप घेतला आहे. संबंधित पंचनाम्याच्या नंतर तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी योग्य ते जाब जबाब घेऊन तसेच संबंधितांना सुनावणीची पूर्ण संधी उपलब्ध करून देऊन संबंधित बोगस व मतदार नावे बोगस मतदार असलेल्याची नावे मतदार यादीतून वगळली. यासंबंधीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. मात्र, या आदेशाच्या विरोधात ग्रामसभा तसेच मासिक सभांमध्ये ठराव घेऊन हा निर्णय बेकायदा असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत गुळूंचे च्या वतीने सध्या सुरू आहे. 
         वास्तविक एकीकडे नियमबाह्य काम करणाऱ्या ग्रामसेवकांविरोधात अनेक तक्रारी दाखल असूनही त्यांच्यावर काहीही कार्यवाही होत नाही. तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे गळे आवळले जात असल्याचा प्रकार गुळुंचे गावकरभाऱ्यांच्या वतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
 "तलाठी यांचे काम नियमाप्रमाणे सुरू आहे.त्यांनी व्यवस्थित पंचनामे केलेले आहेत. प्रसंगी त्यांच्या हितासाठी व न्यायासाठी उपोषण करू." - अक्षय निगडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! गुळुंचेच्या तलाठ्यांच्या विरोधात बिनबुडाची तक्रार
पुरंदर ! गुळुंचेच्या तलाठ्यांच्या विरोधात बिनबुडाची तक्रार
https://lh3.googleusercontent.com/-7Qk3wSR8868/Yfeea6qhH3I/AAAAAAAANBY/uwp9nThjyfYlGaxKPQkm0Y0BR4dq5me_ACNcBGAsYHQ/s1600/1643617881008440-0.png
https://lh3.googleusercontent.com/-7Qk3wSR8868/Yfeea6qhH3I/AAAAAAAANBY/uwp9nThjyfYlGaxKPQkm0Y0BR4dq5me_ACNcBGAsYHQ/s72-c/1643617881008440-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_517.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_517.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy