सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा मोरगाव चे काम अतिशय संथ गतीने सुरू असून संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना गुळुंचे पाणी पुरवठा पाईपलाईन दोन ठिकाणी उखडून टाकली आहे. त्यामुळे गेले आठ दिवस झाले गावाला नसल्याने कांचन निगडे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.
याबाबत निगडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हणटले आहे की, निरा मोरगाव रस्ता रुंदीकरण काम चालू असून हे काम खुप मंद गतीने सुरू असून या ठिकाणी पुलाची कामे करताना गुळुंचे पाणी पुरवठा पाईपलाईन दोन ठिकाणी पूर्णतः उखडून टाकली आहे ,गेले आठ दिवस गुळुंचे गांव पाणीपुरवठा बंद असून दुसरा कोणताही पर्याय नसलेने खूपच गैरसोय होत आहे
संबंधित ठेकेदार यांना विचारणा केली असता आम्ही ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं तुमची माणसं समक्ष उभी करा,त्या पाईपलाईनसी आमचा काही सबंध नाही तुमचं तुम्ही बघा ही उत्तरे देऊन हात झटकले जात आहेत.
जवळपास ९० हजाराच्या आसपास याचा खर्च विनाकारण ग्रामपंचायत करूच शकत नाही, त्यामुळे आपल्या कडून सार्वजनिक बांधकाम विभाग बारामतीला सबंधितांना सूचना देऊन कार्यवाही त्वरित होणे कामी सहकार्य करावे ही विनंती
COMMENTS