सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक


पुणे दि १२

 जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेराज्यमंत्री दत्तात्रय भरणेमहापौर मुरलीधर मोहोळउषा ढोरेजि. प.अध्यक्षा निर्मला पानसरेविभागीय आयुक्त सौरभ रावजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

 

.पवार म्हणाले, 15 ते 18 वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन लशीचा अधिक प्रमाणात पुरवठा होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. तसेच सभागृह आणि खुल्या मैदानातील कार्यक्रमांना 200 पेक्षा अधिक व्यक्तिंच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्याबाबत राज्यस्तरावर चर्चा करण्यात येईल. शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रमांना परवानगीबाबतही शासनस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईलअसे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे श्री.पवार म्हणाले.

 

बैठकीत .राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात साप्ताहिक  पॉझिटिव्हीटी दर 15.10 टक्के होता. मागील आठवड्यात 19 हजार 273 नवीन रुग्ण आढळले आणि 46 हजार 338 रुग्ण कोविडमुक्त झाले.  जिल्ह्यात एकूण 1 कोटी 69 लाख 52 हजार लसीकरण झाले आहे.  60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या 47 टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहेतर 15 ते 18 वयोगटातील 69 टक्के मुलांनी लशीची मात्रा घेतली आहे. लशीच्या पहिल्या मात्रेचे 110 टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे 87 टक्के लसीकरण झाले.

 

बैठकीस आमदार माधुरी मिसाळअशोक पवारअतुल बेनकेदिलीप मोहितेचेतन तुपे,  महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमारराजेश पाटीलयशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगमपोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताकृष्ण प्रकाशमुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुखलोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीपूर्वी कौस्तुभ बुटाला यांनी सामाजिक दायित्व अंतर्गत नाविन्यपूर्ण आरोग्य सुविधांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आमदार अरुण लाड यांच्या विकास निधीतून प्राप्त रुग्णवाहिका आणि आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या 5 फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आलेतसेच हिराभाई बुटाला विचारमंच मार्फत ससून सर्वोपचार रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि मोबाईल ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7029,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
https://lh3.googleusercontent.com/-9Pkp1t8EMew/Yge1VJpB0yI/AAAAAAAAErI/C1xXV55tzBAiuZqxD7IsjUlOR0x7E7sSgCNcBGAsYHQ/s1600/1644672337349047-0.png
https://lh3.googleusercontent.com/-9Pkp1t8EMew/Yge1VJpB0yI/AAAAAAAAErI/C1xXV55tzBAiuZqxD7IsjUlOR0x7E7sSgCNcBGAsYHQ/s72-c/1644672337349047-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_140.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_140.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy