माळेगाव दि ५
माळेगाव व परिसरात मोठ्या उत्साहाने अनेक गणेश मंडळांनी गणेश जयंती साजरी केली असून पोलीस बांधवांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे दिड हजार गणेश भक्तांनी घेतला.
माळेगांव पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस बांधवांनी उभारलेले गणेश मंदिर आहे.गणेश जयंती निमित्त येथे आकर्षक विद्युत रोषणाई व रांगोळी काढण्यात आली होती.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सपत्नीक गणेश आरती घेतली.यावेळी समस्त महिलांसह गणेश मंदिर पुजारी अनगळ काका,ह.भ.प.दराडे महाराज यांच्या उपस्थितीत गणेश जन्माचा पाळणा गाण्यात आला.यावेळी पोलीस बांधवांनी गणेश भक्तांना महाप्रसाद दिला.
या कार्यक्रमास तालुका पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी भेट दिली.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माळेगांव पोलीस दुरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस हवालदार शशिकांत वाघ,राज कानुगडे, राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे, दिपक दराडे, प्रशांत राऊत,पिंटु गव्हाणे यांच्यासह द परफेक्ट पोलीस अॅकडमीचे, सामाजिक कार्यकर्ते,माजी पोलीस, यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान नगर पंचायत व परिसरात शिवशक्ती, श्री भैरवनाथ, भवानी शंकर, अमरसिंह कॉलनी यांच्यासह गोफणेवस्ती,येळेवस्ती, विद्यानगर तसेच माळेगांव खुर्द येथील श्री अष्टविनायक गणेश मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
माळेगाव येथिल गणेश मंदिरात अनेक पोलीस बांधव आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.गणेश जयंती निमित्त पोलीस बांधवांचा स्नेह मेळावा रंगला होता.
COMMENTS