सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जावली : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली व जिल्हा परिषद सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि .०१/०३/२०२२ रोजी पंचायत समिती जावली (मेढा ), जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मेढा याठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी यामध्ये , मुकबधीर, कर्णबधीर, अस्थिव्यंग, अंध , यांचे साठी तपासणी शिबिर आयोजीत केलेले आहे तपासणी करून आवश्यकते नुसार त्यांना साहीत्य पुरवले जाणार आहे. तसेच दि ०२/०३/२०२२ रोजी साठ वर्षावरील वयोवृध्द लोक ज्यांना व्याधी सुरु . अशा लोकांची तपासणी करून त्यांना चालण्याची , कंबर , मानेचा पट्टा, चष्मा ईत्यादी साहीत्य पुरवले जाणार आहे
शिबिरातील लाभार्थानी आधारकार्ड व रक्कम रू १,८०,०००/- आतील तलाठी तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला व दोन फोटो घेवून ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांचेशी संपर्क करून आपले नाव नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरीकांसाठी सदरचे शिबिर अत्यंत महत्वपूर्ण असल्याने पात्र लाभार्थानी आपले नाव नोंदणी करून घ्यावी व या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन . सौ.जयश्रीताई गिरी,सभापती पंचायत समिती जावली.सौरभ शिदे उपसभापती पंचायत समिती जावली,राजेंद्र पोळ तहसिलदार जावली,रमेश काळे गट विकास अधिकारी, पंचायत समिती जावली ,भानुदास साळवे, सहायक गट विकास अधिकारी , पंचायत समिती जावली यांनी केले आहे.
COMMENTS