सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
येथील कृष्णामाई उत्सवास माेठ्या उत्साहात पारंपारिक पध्दतीने सुरुवात झाली.
ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मागील वर्षीही असाच साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला हाेताे. येथील भीमकुंड आळी ऊर्फ भीमाशंकर संस्थान घाटावरील कृष्णामाई उत्सवाची सुरुवात झाली. सकाळी उदकशांत झाल्यानंतर पारंपारिक पध्दतीने कृष्णामातेच्या पालखी मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर धार्मिक पध्दतीने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
पुढील चार दिवस चालणार्या या उत्सवामध्ये राेज सकाळी ७ वा. आरती व मंत्रपुष्पांजली, ८ वाजता लघुरुद्र, दुपारी ४ वा. मंत्रजागर व महिलांचे श्रीसुक्त पठण, सायंकाळी ५ वा. भजन, रात्री ८ वा. भजन असे धार्मिक कार्यक्रम हाेणार आहेत.
तसेच गुरुवार दि. ३ राेजी सायंकाळी ५ वा. गंगापुरी येथील कृष्णाई भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ९ वा. सिध्देश्वर कुराेली येथील बाल किर्तनकार अभिषेक जाेशी यांचे किर्तन हाेणार आहे. शुक्रवार दि. ४ राेजी सायंकाळी ६ वा. हळदीकुंकू, रात्री ९ वा. साै. ऋता नवाथे व साै. राधिका आडिवरेकर यांचे जाेड किर्तन हाेणार आहे. शनिवार दि. ५ राेजी. सायंकाळी ६ वा. गंगापुरी येथील गार्गी भजनी मंडळाचे भजन, रात्री ९ वा. ह. भ. प. काैस्तुभ वैद्य यांच्या लळीताच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता हाेईल. तरी भाविकांनी शासकीय नियमांचे पालन करुन कृष्णामाईचे दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थांनचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.
COMMENTS