सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी स्वतः फेसबुक अकाऊंट वरून माहिती देत संपर्कातील लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत जगताप टाकलेल्या पोष्टमध्ये म्हटले आहे की,
माझी कोरोना ॲन्टीजन चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून,गेल्या दोन-चार दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.माझी तब्येत चांगली असुन डॅाक्टरांच्या सुचनेप्रमाणे औषधोपचार घेत मी विलगीकरणात आहे.
लवकरच आपल्या सर्वांच्या अशार्वादाने आपल्या सेवेत हजर होईल.आपणही आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करीत मास्क वसॅनिटायझरचा वापर करावा.
आपला
पुरुषोत्तम रामराजे जगताप
COMMENTS