सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ काञज डेअरीच्या निवडणूकीसाठी भोर तालुक्यातून ५ अर्ज आले होते. त्यापैकी ४ अर्ज वैध ठरले असून एक अर्ज अवैध ठरला आहे.निवडणुकीसाठी चार अर्ज वैध ठरले असले तरी खरी लढत मात्र आजी-माजी संचालकामध्ये म्हणजे थोपटे विरुद्ध थोपटे अशी होणार असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे.
पुणे जिल्हा दुध संघ काञज डेअरीच्या पंचवार्षिक निवडणूकीचसाठी भोर तालुक्यातून विद्यमान संचालक दिलीप पांडुरंग थोपटे, माजी संचालक बाळासाहेब विठ्ठलराव थोपटे ,नितीन भिकोबा थोपटे,दीपक रोहिदास भेलके,रुपाली सचिन थोपटे तर महिला राखीव मधून नीता पंडित गोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यातील रुपाली थोपटे यांचा अर्ज अवैध ठरला आहे.एकंदरीत पुणे जिल्हा दुध उत्पादन संघ काञज डेअरीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर होताच भोर तालुक्यातून आजी - माजी संचालकांनी अनेक मतदारांना बाहेर घेऊन गेले असल्याची चर्चा सुरू आहे.
COMMENTS