सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर- वेल्हा -मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत तसेच त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामांचा धडाका पाहून तालुक्याच्या आंबवडे खोऱ्यातील कोर्ले येथील महादेव भैरू चिकणे, सादू लक्ष्मण चिकणे, दिनकर कृष्णा चिकणे, गणपत मारुती चिकणे, लक्षमण रामजी चिकणे, शंकर नथू चिकणे अन्य ग्रामस्थांनी रविवार दि-६ राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.यामुळे आंबवडे खोऱ्यात राष्ट्रवादी को काँग्रेसला धक्का बसला आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून काँग्रेस पक्षात सामील केल्याचे जाहीर केले.यावेळी सामजिक कार्यकर्ते अनिल सावले, संतोष केळकर, सरपंच मारुती चिकणे, उपसरपंच गोपाळ चिकणे, माजी सरपंच आनंदा चिकणे, शिवराम चिकणे, ज्ञानेश्वर चिकणे, शंकर नथू चिकणे, रोहिदास चिकणे, राजेंद्र चिकणे, विजय चिकणे, तेजस चिकणे, शंकर चिकणे, बाळू चिकणे, लक्ष्मण चिकणे, अजित चिकणे, संतोष पिसाळ, हरिभाऊ चिकणे, सोपान चिकणे, सुनील चिकणे उपस्थित होते.
COMMENTS