सोमेश्वर रिपोर्टर टीम------
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.
त्याच्या निधनाने सुमारे २०/२५ वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण आली.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे डॉ. सिद्धे यांचा दवाखाना होता. तेथे ते नियमीत समाजातील गुणवंताना माई मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करत असत. एकदा असेच पुरस्कारासाठी लता दीदीना फलटण ला बोलावण्यात आले .त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली ...प्रवेश द्वारापासुन गुलाबाच्या पाकळ्याच्या पायघड्या अंथरल्या होत्या ... त्या गाडीतुन उतरल्या आणी आयोजकाना म्हणाल्या अहो मी ईतकी महान नाही गुलाबाच्या पाकळ्यावरुन चालणे मला योग्य वाटत नाही... त्यानी त्यातील दोन चार पाकळ्या उचलल्या त्याचा सुगंध घेतला .. पायातील चप्प्प्ल काढली व पायघड्या शेजारुन चालत मंचावर पोहोचल्या ..पोलीसाना गर्दी आवरल्या जात नव्हती. अनेकाना हा सोहळा पाहता आला नाही .प्रसिद्धी च्या उंच शिखरावर असताना पाय जमीनीवर ठेवुन निर्जीव पाकळयांचा देखील सह्र्दयतेने आदर करणाऱ्या लता दीदीचे कार्य महान आहे हजारो अजरामर गीते तर त्यानी आपल्याला दिलीच या शिवाय त्यानी अनेक दिग्गज कलाकार ,शाहीर जेव्हा परिस्थिती ने अडचणीत आले तेव्हा स्वत: त्या काळी लाखो रुपयांची मदत केली समस्त भारतीयासाठी अभिमानास्पद असलेल्या लतादीदी नक्कीच अमर राहतील यात शंका नसावी त्यांच्या कार्यकर्तुत्वाला सलाम ...
------------------
लेखक हे वकील असून साप्ताहिक सोमेश्वर रिपोर्टर चे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहतात.
------------------
सोमेश्वर रिपोर्टर टिम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली...
COMMENTS