सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भादे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बहिनेने बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील पोलीस असलेल्या भावाला स्वतःचे लिव्हर देत दिले जीवदान दिले आहे. वाघळवाडी येथील एका महिलेने स्वतःचा जीव धोक्यात घालून भावाला लिव्हर दान केले आणि भावाचा जीव वाचवला. वाघळवाडी येथील आप्पासाहेब नावडकर यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी मालन बापूसाहेब चव्हाण (नावडकर) रा.भादे ता.खंडाळा.जि.सातारा हिने तिचा भाऊ रुपेश आप्पासाहेब नावडकर (रा.वाघळवाडी, ता.बारामती. जि.पुणे) याला लिव्हर दान करून यांचे प्राण वाचवले. रुपेश हे पोलीस कर्मचारी आहेत. त्यांचे लिव्हर खराब झाले होते. त्यांना तातडीने लिव्हर ची गरज होती.पण कुठेच लिव्हर मिळाले नाही.तेव्हा त्यांच्या धाडसी बहिणीने स्वतः चे लिव्हर त्यांना देऊन भावाचे प्राण वाचवले. मालन चव्हाण या भादे या गावी ग्रामपंचायत सदस्या आहेत. दि.२ फेब्रुवारी रोजी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल मधे त्यांचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले.
इतर सर्व भगिनींपुढे या महीले ने एक आदर्श ठेवला आहे .या तिच्या धाडसाबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
COMMENTS