सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
ठरल्याप्रमाणे माळेगाव खुर्द सरपंचपदी सुनिल शहाजी शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
श्री यमाई देवी पुण्याईने पावन असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगांव खुर्द हे गाव राजकारणात दिलेला शब्द पाळणारे गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जाते.माजी सरपंच मंगेश काटे यांनी ठरलेल्या मुदतीत राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त होते.
रिक्त सरपंच पदासाठी सुनील शहाजी शिर्के यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी एल.एस.मुळे यांनी जाहीर केले.त्यांना तलाठी अमोल मारग व ग्रामसेवक संतोष वसेकर यांनी मदत केली.
माजी सरपंच मंगेश काटे यांनी नुतन सरपंच सुनील शिर्के यांचा पुष्पहार घालून अभिनंदन केले.तसेच सोसायटीचे नुतन चेअरमन प्रशांत काटे यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी माळेगांव कारखान्याचे संचालक संजय काटे, सदस्या संध्या जगताप, राजश्री आडके, पल्लवी काटे,मनिषा काटे सदस्य आदित्य काटे,बापु शिर्के, अशोक जगताप,परशुराम आडके,बाळासो काटे,विक्रम पवार, गणेश तावरे, अजिंक्य गायकवाड,अॅड. पंकज काटे उपस्थित होते.
दरम्यान सर्व सदस्य, जेष्ठ नेते, ग्रामस्थ यांना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत असे निवडीनंतर सरपंच सुनील शिर्के यांनी सांगितले.
फोटो ओळी- माळेगांव खुर्द सरपंचपदी सुनिल शिर्के यांची बिनविरोध करण्यात आली.
COMMENTS