सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व साताराचे पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनानुसार व पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे - खराडे मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या प्रयत्नातून शाळा-कॉलेज तसेच विविध कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुली यांना होणारी छेडछाड व विविध अत्याचारांच्या बाबतीत सजग राहून कशा प्रकारे प्रतिकार करता येईल याकरीता जावळी तालुक्यातील विविध शाळांमध्ये सध्या मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे बरोबरच इतर अत्यावश्यक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात आहे या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्याचा समारोप कुडाळ येथे संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना शीतल जानवे खराडे म्हणाल्या,सध्याच्या धावपळी च्या युगात महिला मुलींच्या रक्षणाकडे सर्वसामान्य लोकांचे दुर्लक्ष होताना दिसत असून पोलिस यंत्रणा वेळेवर पोहोचेल असे नाही त्यामुळे महिला व मुलीनी सर्वप्रथम स्वतःची रक्षा स्वतः करण्याकड़े लक्ष दिले पाहिजे त्यासाठी कराटे व इतर खेळ तसेच आवश्यक गोष्टीचे प्रशिक्षण घेवून आत्मनिर्भर झाले पाहिजे त्यासाठी सर्वानी पोलिस खात्याला सहकार्य करावे.
या प्रशिक्षणासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने,निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मेणकर मॅडम यांच्याबरोबरच संपूर्ण मेढा पोलिस स्टेशनचा पोलीस स्टाफ गेले अनेक दिवस विविध शाळांमध्ये कराटे ट्रेनर प्रीती गोंधळी यांचे सहाय्याने प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहेत. या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचा समारोप दत्तगुरू मंगल कार्यालय कुडाळ येथे संपन्न झाला .यावेळी सर्व पोलिस अधिकारी , जिल्हा परिषद शाळेचे सर्व स्टाफ ,कुडाळ चे उपसरपंच सोमनाथ कदम ,अविनाश गोंधळी,महेश पवार,महेश कदम,पोलिस पाटिल सुहास भोसले व विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थिनी , ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी शालेय मुलींनी गेले अनेक दिवस घेत असलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले .
COMMENTS