सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
जावली : प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांच्या पासून सार्वजनिक एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल व नुकसान होत असून यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून येत्या मार्च व एप्रिल महिन्यात दहावी व बारावी तसेच इतर शालेय परीक्षा सुरु होत असून येणाऱ्या परीक्षा कालावधी मध्ये मुलींना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा स्थळी वेळेवर पोहचण्यासाठी अडचण होऊ नये या करीता कुडाळ ता. जावली येथील युवा उपसरपंच सोमनाथ कदम सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यानी या बाबत पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे खराडे यांचे कड़े चर्चा केली असता असा उपक्रम राज्यात प्रथमच राबविला जात असून याचे कौतुक केले.
या मोफत परिवहन सेवे करीता कुडाळ पोलिस दूरक्षेत्रामधील पोलिस कर्मचारी इमरान मेटकरी व घोरपडे यांच्या सहकार्यातून सोमनाथ कदम व महेश पवार तसेच गजराज मित्र मंडळ , साई चौक मित्र मंडळ व आपलं पिंपळबन यांच्यावतीने परीक्षा कालावधी दरम्यान कुडाळ- पाचवड- भुईंज या ठिकाणी परीक्षेकरीता जाणाऱ्या मुला मुलीना मोफत परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे .या उपक्रमाचे उपस्थित पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे खराडे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने व अधिकारी वर्गाच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल देऊन संचालन करण्यात आले. व कौतुक करण्यात आले . याच पद्धतीमध्ये असे उपक्रम परीक्षा कालावधीमध्ये आजूबाजूच्या विविध गावांमध्ये राबवण्याचे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले.
COMMENTS