सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
परिंचे (वार्ताहर)
श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे माघ वद्य अमावस्ये निमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरीच्या उत्सव मूर्तींना पोशाख परिधान करून अलंकारांनी सजविण्यात आले होते. कोव्हीड १९ चे नियम पाळून देवाचे अलंकारिक रुप पहाण्यासाठी महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे चार वाजता श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उस्तव मुर्तींची महापूजा करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी आठ वाजता देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने अभिषेक करण्यात आले. सकाळी दहा वाजता उस्तव मुर्तीं समोर भाविकांच्या दहीभात पुजा बांधण्यात आल्या. दुपारी बारा वाजता धुपारती करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी एक वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपार नंतर देवाला अलंकारिक पोशाख करण्यात आला. रात्री साडेनऊ वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. देऊळ वाड्यातील दगडी कासवावर साळकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, दर्शन बारी, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, स्वयंसेवक आधी सुविधा पुरविण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, अभिजित धुमाळ, अमोल धुमाळ, नामदेव जाधव, शिवाजी कदम, संजय कापरे, राजेंद्र कुरपड तसेच सल्लागार रामचंद्र धुमाळ, माधव धुमाळ, तानाजी धुमाळ, शंकर धुमाळ, विशाल धुमाळ यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
COMMENTS