सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी
न्यु मॉडेल इंग्लिश मिडीअम स्कूल, सासवड येथे स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान तर्फे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .,या कार्यक्रमास स्व .एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, संस्था विद्या समिती सचिव.सुळगेकर शाळेच्या मुख्याध्यापिका सुळगेकर, बोराटे जी .जे. मुख्याध्यापक श्री .कातोबा हायस्कूल , दिवे मिनाक्षी दिलीप जगताप संचालिका श्री अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड सुमन शिरवळकर अध्यक्ष अखिल भारतीय कस्तुरबा महिला संघ सासवड .निर्मला यशवंत जगताप माजी उपनगराध्यक्षा सासवड नगरपालिका, कुमूदिनी पांढरे उपअध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी श्रीमती मिनाक्षी कृष्णराव जाधव संचालिका सावित्री महिला सहकारी पतसंस्था सासवड,. दिपाली संतोष जगताप या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण केले .विद्यार्थ्याना भरघोस बक्षिस देऊन त्यांचे कौतुक केले .स्व एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान सासवड व न्यु मॉडेल इंग्लिश मिडिअम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील सर्व माता पालक व शिक्षिकांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . अशा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या समन्वयक जाधव एम के यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना राऊत व . देशपांडे यांनी केले ज्योती जगताप व वसुधा जगताप यांनी आभार मानले .
COMMENTS