सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
इंदिरा गांधी तांत्रिक विद्या निकेतन सोमेश्वरनगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी जिल्हा परिषद सदस्य व इंदिरा गांधी तांत्रिक विद्या निकेतन संचालिका सविता काकडे व दत्त दिगंबर बिगर शेती ग्रामीण पतसंस्था नीरा संचालिका रागिनी कुलकर्णी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात मध्ये दोन महत्त्वपूर्ण व्याख्याने झाली पहिला म्हणजे महिलांचे आरोग्य या विषयावर स्त्री रोग तज्ञ डॉ. शमा केंजळे यांनी महिलांच्या आरोग्याच्या समस्या व व्यायामाचे महत्त्व याविषयी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली किशोरवयीन मुलींच्या समस्या व उपाय योजना व आहाराबद्दल सुद्धा उपयुक्त अशी माहिती महिलांना दिली त्यानंतर दुसरा व्याख्यात्या वर्षाराणी जगताप यांनी उद्योजकता या विषयी महिलांना मार्गदर्शन केले आजची स्त्री कशाप्रकारे स्वावलंबी होऊ शकते व नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसाय कशाप्रकारे श्रेष्ठ आहे हे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितले त्यांचे स्वतःचे आठ ते नऊ बचत गट आहेत व त्यातून त्यांनी उद्योग व्यवसायाला कशाप्रकारे सुरुवात केली हे सांगताना त्यांनी महिलांना उद्योग व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले नंतर इंदिरा गांधी तांत्रिक विद्या निकेतन या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या प्रियंका रोकडे यांनी या संस्थेचे चालणाऱ्या विविध क्लासेस विषयी माहिती महिलांपर्यंत पोहोचवली उदाहरणार्थ मराठी हिंदी इंग्लिश टायपिंग टंकलेखन स्टेनो टॅली CCC जी सरकारी नोकरीसाठी अतिशय उपयुक्त असे क्लास आहे त्याचबरोबर शिवण क्लास मेहंदी रांगोळी ब्युटी पार्लर हॉबी क्लासेस मसाले क्लास केकचे क्लास योगा क्लास इत्यादी अनेक प्रकारच्या क्लासेसची माहिती दिली या संस्थेमध्ये शिकून गेलेल्या विद्यार्थिनींनी आपले अनुभव सांगितले व त्यातून त्या कशा प्रकारे यशस्वी झाल्या ते सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व इंदिरा गांधी तांत्रिक निकेतन च्या संचालिका सविता काकडे, रागिनी कुलकर्णी डॉ. शमा केंजळे वर्षाराणी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सविता काकडे यांनी महिलांनी स्वतःला उद्योग व्यवसायाकडे वळावे हा संदेश या महिला दिनानिमित्त दिला.
मु सा काकडे महाविद्यालयाचे संचालक नितीनशेठ कुलकर्णी. प्राचार्य डाॅ देवीदास वायदंडे. सह सचिव सतिश लकडे, निकेतनचे सचिव शिवाजी नेवसे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या संस्थेच्या व्यवस्थापिका प्रियंका तांबे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी यादव यांनी केले व आभार सुचिता नादखिले यांनी मानले व निकेतन वरील सर्व सहकारी महिला उज्वला लोखंडे सारिका जगताप प्रिया जगताप भक्ती केंजळे प्रियंका रोकडे व सेवक चंद्रकांत पवार यांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
COMMENTS