सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर मध्ये सर्व महिला शिक्षिकींचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य एस. पी.जगताप सर यांनी महिला ही नारीशक्ती आहे, सहनशक्ती आहे, ती आहे म्हणून हे जग आहे. यावेळी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अंतराळवीर कल्पना चावला, लता मंगेशकर इ. स्त्री शक्ती आज जगासाठी आदर्श आहेत.आज समाज त्यांची भक्ती करतो असे विचार व्यक्त केले. जेष्ठ शिक्षक रणवरे बी. बी. यांनी आजच्या युगात महिला कशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असतात, महिलांचे घरातील, समाजातील स्थान या विषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी समीक्षा गडदरे हिने कविता सादर केली. तर सानिका ढोणे व प्रतीक्षा सावंत या मुलींनी मुलगी शिकली की कशी प्रगती होते या विषयी मनोगत व्यक्त केले.
सौ.कुलकर्णी पी आर, सौ. पिसाळ एल एस, सौ.गायकवाड व्ही ए, सौ. शेंडकर आर एस, सौ. चव्हाण एल एच, सौ. होळकर जे डी, सौ. भोसले पी ए, सौ. खोमणे एम डी, सौ. जगताप एस एन , सौ. कदम व्ही व्ही, सौ.यादव मॅडम,सौ. केदार एस एस, सौ. जगताप एस ए, श्रीमती जगताप बाई,सफाई सेविका कांबळे, टेकवडे इ. चा प्रशालेच्या वतीने गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.इयत्ता नववी वर्गाच्या वतीने देखील महिला शिक्षिका गुरुवर्याचा भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक भोसले ए. एस,धुमाळ एम. बी,वाडकर डी. टी, शिंदे वाय. एस, जगताप पी. बी,कदम एस. के, महाले वाय. एस इंगळे जी. आर,कुलकर्णी एस एस, इ उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजेंद्र झुरंगे व अनुजा माहोळ कर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक साक्षी वायकर या विध्यर्थिनीने केले तर आभार सौ. चव्हाण एल. एच.यांनी मानले.
COMMENTS