सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील आयसीआयसीआय या बँकेने एका खातेदाराला पाच मिनिटांत तब्बल ५० लाख रुपये कर्ज मंजूर केले तर कोणतेही मॉर्गिज, प्रोशेस फी, स्टॅम्प ड्युटी, जमीनदार असे कोणतेही नियम न लावता एक तासात तब्बल ५० लाख रुपये त्या खातेदाराच्या खात्यावर वर्ग केले.
सोमेश्वरनगर येथील दीपक साखरे या उद्योजकाला हा icici bank शाखा करंजेपुल बँकेचा सुखद अनुभव आला आहे. उद्योजक दीपक साखरे हे काल कामानिमित्त पुणे येथे निघाले होते. बँकेतून बँक मॅनेजर चा फोन येतो पाच मिनिटं बँकेत येऊन जावा. तिथं गेल्यावर त्यांना समजले की बँकेने चक्क आपलेला ५० लाखांचे कर्ज मंजूर केले आहे. साखरे त्यांचेकडून बँकेने कोणत्याही प्रकारचे तारण न घेता विनातरणी हे कर्ज साखरे यांना दिले आहे.
बँकेचे शाखाप्रमुख प्रशांत भालिंगे यांनी सांगितले की, दीपक साखरे यांचे आम्ही व्यवहार पाहून हे कर्ज आम्ही त्यांना देऊ केले आहे. मागील अकरा महिन्यात २० खातेदारांना सव्वा कोटीच्या आसपास कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तर चालू महिन्यात ८० लाख कर्ज वाटप केले आहे.
-------------------
दीपक साखरे - उद्योजक
आयसीआयसीआय बँकेने मला दिलेले हे ५० लाखाचे कर्ज माझ्यासाठी सुखद धक्का आहे. या कर्जाचा व्याजदर पतसंस्थेच्या व्याजदरा एवढाच असला तरी बँकेने माझ्याकडून कोणतेही चार्जेस, कपात, जमीनदार घेतले नसल्याने सर्वच खातेदारांना अशा प्रकारे कर्ज दिले तर नागरिक पतसंस्थेच्या जाचक अटीपासून निश्चित वाचेल.
COMMENTS