सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
अन्न-पाण्याच्या शोधात असताना जखमी होऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवडी खुर्द ता.भोर येथील प्रांगणात पडलेल्या कबुतरास शाळेतील बालचमुन्नी पक्षी मित्राची भूमिका पार पाडत जीवदान दिले. विध्यार्थ्यांनी कबुतरावर औषध उपचार करुन शिक्षकांच्या स्वाधीन केले.विद्यार्थ्यांनी पक्षीमित्राची भुमीका पार पाडल्याने विसगाव खोरे परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.उन्हाळा सुरू झाल्याने पक्षी तसेच मुक्या प्राण्यांसाठी घरांच्या अंगणात किंवा शाळेच्या प्रांगणात पाणी व चाऱ्याची सोय करावी असे आवाहन विध्यार्थी व शिक्षकांकडून करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक संजय पवार,उपशिक्षक बापू जेधे,अनिल महांगरे ,अमर क्षीरसागर तसेच पालक उपस्थित होते.
COMMENTS