बारामती ! 'निंबुत'ची ही दानशूर व्यक्ती ११ लाखांच्या मानधनातून कामगारांच्या कुटुंबियांना देणार भेटवस्तू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष  तथा ज्यूबिलंट कामगार युनियनचे अध्यक्ष सतीश काकडे हे कामगार युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांना मिळालेले तब्बल ११ लाख २० हजार रुपयांचे मानधन कामगारांच्या कुटूंबियांना भेटवस्तू देणार आहेत. 
             याबाबत शनिवार दि.५ रोजी  बारामती टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या भेटवस्तू कामगारांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहेत. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे करंड, साड्या तसेच कामगारांना पोशाख देण्यात येणार आहे.
           सतिश काकडे यांनी स्वतःला मागील तीन वर्षात मिळालेल्या ११ लाख २० हजार रुपयांच्या भेटवस्तू कामगारांच्या कुटुंबियांना वाटप करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे काकडे हे ज्युबिलंट कामगार युनियन चे पाहिले अध्यक्ष असल्याचे युनियनचे जनरल सेक्रेटरी सुनीलदत्त देशमुख यांनी सांगितले.
To Top