कौतुकास्पद...! माळेगाव येथे रस्त्यावर सापडलेला मोबाईल पोलोसांच्या स्वाधीन : शालेय विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
  शालेय विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा..‌  रस्त्यावर सापडलेला मोबाईल पोलिसांना  परत दिला.  शालेय विद्यार्थी आदित्य जाधव याचेवर प्रामाणिकपणा बद्दल सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे
      निरा- बारामती या राज्यमार्गालगत विवो कंपनीचा साधारणपणे विस- बाविस हजारांचा एक मोबाईल एस.एस.एम.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे नववीत शिकत असलेल्या आदित्य नंदकुमार जाधव रा.जाधव वस्ती माळेगाव यास सापडला.त्याने सापडलेला मोबाईल माळेगांव पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार राम कानुगडे व पोलीस शिपाई प्रशांत राऊत यांना दिला.
     सदर मोबाईलचा तपास केला असता तो शिवनगर येथिल हाॅटेल व्यावसायिक पोपट शिवाजी बोराटे यांचा होता.पोलिसांनी खात्री पटवून आदित्य जाधव यांच्या हस्ते पोपट बोराटे यांना त्यांचा मोबाईल परत दिला.बोराटेंनी आदित्य यास प्रामाणिकपणा बद्दल बक्षीस देऊन अभिनंदन केले.
     दरम्यान या प्रामाणिकपणा बद्दल आदित्य जाधव यांचा एस.एस.एम.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डि.सी.धुमाळ यांनी सत्कार केला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.
    फोटो ओळी- रस्त्यावर सापडलेला मोबाईल आदित्य जाधव यांनी पोपट बोराटे यांना दिला. 
To Top