सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी
जनहित मंच पुणे व कोथळे ग्रुपच्या वतीने कोरोना संकटाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकप्रतिनिधी,आरोग्यसेवक,शिक्षक व पत्रकारांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला तसेच दहावीच्या परीक्षार्थीना परीक्षेसाठी उपयुक्त शालेय साहित्य वाटण्यात आले. जनहित जागृती मंच पुणे, आणि कोथळे ग्रुपच्या वतीने गुरुवार दि ३ रोजी पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मंचाचे संस्थापक अध्यक्ष विजय जगताप, कार्याध्यक्ष बापुसो जगताप तसेच राज्याच्या अध्यक्षा संजना जगताप यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता समाजाच्या हितासाठी उल्लेखनीय कार्याबद्दल कोथळे गावाचे सरपंच शहाजी जगताप, आरोग्य अधिकारी शामल गाढवे, अंगणवाडीच्या अधिकारी रेखा खटावकर,आशा वर्कर मनीषा शिर्के, मंगल दोडके, अंगणवाडीसेविका मंगल जाधव,जमुना जगताप, कमल जगताप,कविता जगताप,रेखा गायकवाड मुख्याध्यापक काशिनाथ भोंग,गोविंद लाखे,पत्रकार नितीन राउत ,निलेश जगताप यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच दहावीच्या परीक्षार्थींना यावेळी परीक्षेसाठी उपयुक्त शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरंदर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समितीच्या सदस्य सुनिता कोलते, सरपंच शहाजी जगताप, उपसरपंच वंदना जगताप, सदस्य अभिजित जगताप,बापुसो जगताप ,नीरा मार्केट समितीचे माजी सभापती विठ्ठल मोकाशी,संचालक सुनील धिवार,संभाजी काळाने, ,पुरंदर नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक जगताप,दत्तात्रय भोईटे,प्रवीण काकडे शांताराम जगताप आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी, आरोग्यसेवक,आशा वर्कर,शिक्षक ,पत्रकार यांनी केलेल्या कार्याची जाणीव ठेवून मंचाच्या वतीने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी सांगितले. जनहित जागृती मंचाच्या वतीने न्याय हक्कासाठी , भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी आणि सर्वसामन्यांना मदतीसाठी काम केले जात आहे असे मंचाचे संस्थापक अध्यक्ष विजय जगताप यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन मंचाचे पदाधिकार्यांनी केले.
COMMENTS