जावली:प्रतिनिधी
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली व जिल्हा परिषद सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि .०१/०३/२०२२ रोजी पंचायत समिती जावली (मेढा ), जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मेढा याठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी यामध्ये , मुकबधीर, कर्णबधीर, अस्थिव्यंग, अंध , यांचे साठी तपासणी शिबिर आयोजीत केलेले होते .या पहिल्या दिवसाच्या शिबीरामध्ये ६२८ लाभार्थीनी लाभ घेतला.
सदरच्या शिबीराचा उट्घाटन समारंभ उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला,तहसिलदार जावली राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी भानुदास साळवे , सहायक प्रशासन अधिकारी बी .सी. पंधरे यांच्या उपस्थित संपन्न झाला. पहिल्या दिवसाच्या शिबीरासाठी हजारो लाभार्थी जावली तालुक्याच्या विविध गांवातून उपस्थति राहीले होते त्यापैकी विविध तपासण्या केल्यानंतर ६२८ लाभार्थी यांची निवड झाली असून डॉक्टरांनी शिफारस केल्या प्रमाणे आवश्यक साहित्य गांव गावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन महिन्यानंतर मिळणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी दिली.
पहिल्या दिवसाच्या या शिबीरामध्ये डॉ. शुभम पवार , डॉ. कावेरी हवाळे, डॉ. तारा विश्वकर्मा , डॉ. श्रृषा कांबळे, डॉ. रोहिणी कारंडे, डॉ. राजकुमार यादव,
डॉ. शामलजी यादव , डॉ. शैलेंद्र राणा , डॉ. गौरव राणा, डॉ . योगेंद्र , डॉ. शिवम, डॉ , मोनाली कावरे .डॉ. मयुरी गायकवाड यांनी शिबीरामध्ये कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यासाठी पुर्व तपासणी व नौदणी कामी विशेष परिश्रम घेतले.
सदरच्या शिबीरास मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, जावली बॅंकेचे चेअरमन राजाराम ओंबळे , माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, नगरसेवक विकास देशपांडे,नगरसेवक / पत्रकार शशिकांत गुरव, विजय सपकाळ यांच्यासह मान्यवर उपस्थति होते . शिबीर यशस्वी करण्यासाठी मेढा. प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक , त्यांचे सहकारी , शिक्षक वृंद , अंगणवाडी पर्यवेक्षीका ,सेविका , मदतनिस , बांधकाम ,, ग्रामिण पाणीपुरवठा उपविभाग , ग्रामपंचायत विभाग , विस्तार अधिकारी ( सर्व ) , पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक , तलाठी, , आरोग्य विभाग सर्व . अधिकारी कर्मचारी वृंद , डाटा एंट्री ऑपरेटर , संग्राम कक्ष यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
तसेच या शिबीरामध्ये दि ०२/०३/२०२२ रोजी साठ वर्षावरील वयोवृध्द लोक ज्यांना व्याधी सुरु . अशा लोकांची तपासणी करून त्यांना चालण्याची , कंबर , मानेचा पट्टा, चष्मा ईत्यादी साहीत्य पुरवले जाणार आहे यासाठी संबंधीत लाभार्थानी आधारकार्ड रक्कम रू १,८०,०००/- आतील तलाठी तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला व दोन फोटो घेवून ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांचेशी संपर्क करून आपले नाव नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरीकांसाठी सदरचे शिबिर अत्यंत महत्वपूर्ण असल्याने पात्र लाभार्थानी आपले नाव नोंदणी करून घ्यावी व या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन . ह. भ.प..जयश्री गिरी,सभापती पंचायत समिती जावली (मेढा). .सौरभ शिदे उपसभापती पंचायत समिती जावली (मेढा). .राजेंद्र पोळ तहसिलदार , तहसिल जावली( मेढा ) ,. रमेश काळे गट विकास अधिकारी, पंचायत समिती जावली , भानुदास साळवे, सहायक गट विकास अधिकारी , पंचायत समिती जावली( मेढा ) यांनी केले आहे.