सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
पुणे जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने भोर येथे कार्यरत असलेले प्रसाद घनश्याम सोले यांना सन्मानित करण्यात आला.
पुणे येथील गणेश कला क्रिडा सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे ,उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,बांधकाम व समाजकल्याण सभापती प्रमोद काकडे , मुख्यकार्यकारी आयुष प्रसाद , उपमुख्यकार्यकारी सचिन घाडगे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते प्रसाद सोले यांनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.सोले हे मागील १३ वर्षापासून भोर तालुक्यात ग्रामसेवक पदावर कार्यरत असून त्यांनी नाटंबी, पानव्हळ, संगमनेर,इंगवली, अंगसुळे,भावेखल, वरवे खु. येथे कामकाज पाहून ग्रामपंचायती आदर्श केल्या. तसेच कोरोना काळामध्ये योग्य प्रकारे उपाय योजना केल्यामुळे दोन्ही गावामध्ये कोरोनाचा कमीत कमी प्रादुर्भाव झालेला होता आणि एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.तसेच १०० टक्के लसीकरण करून घेतले आहे. तर
गावातील शाळा अंगणवाडी विशेष कार्यक्रम राबवून शिक्षणासाठी मुलांना प्रोत्साहित केले.शेतकऱ्यांसाठी सहलीचे आयोजन केले. याची दखल प्रशासन विभागाने घेऊन सोले यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त केला
COMMENTS