धक्कादायक... ! 'ती' रोज यायची त्याच्या शेतावर कामाला...! मंग शेती मालकाने साधला डावा : बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी  
भुईंज वरचे चाहुर येथील रहिवासी असलेला शेत मालक ऊमेश बबन भोसले वय  ३५ याने  जांब येथून शेतीच्या मजुरी वर येणार्या एका विवाहित महिले वर वाई शहरातील एका लॉज मध्ये नेहुन आणी २०२० व २१ दरम्यान स्वताच्या शेतात वेळो वेळी बलात्कार केल्याने  पिडीत महिला हि सहा महिन्याची गरोदर असल्याने तिने या बाबतची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात दाखल होताच सपोनि आशिष कांबळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वरील आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
              सपोनि आशिष कांबळे यांनी दिलेली माहिती अशी की भुईंज वरचे चाहुर येथील रहिवासी असलेला शेतकरी ऊमेश बबन भोसले याच्या शेतात त्याच्या परिसरातील  गावांन मधील एक ३२ वर्षीय विवाहित महिला घरची परिस्थिती हालाकेची असल्याने ती मजुरीच्या कामावर
 शेतातील कामा साठी येत होती तिच्या गरिबीचा व असाहाय्यतेचा गैर फायदा घेऊन  ऊमेश भोसले याने वाई येथील लॉज वर नेहुन  आणी स्वताच्या मालकीच्या शेतात सन २०२० आणी २१ |२२ मध्ये वेळो वेळी बलात्कार केल्याने संमधीत पिडीत महिला ही सहा महिन्याची गरोदर राहिल्याने एकच खळबळ उडाल्याने संमधीत पिडीत महिलेने भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांची भेट घेऊन  घडल्या प्रकाराची माहिती सांगितली प्रकरण गंभीर असल्याने कांबळे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन ऊमेश भोसले याला अटक केल्याने चाहुर सह भुईंज गावात खळबळ उडाली आहे .या गुन्ह्याचा अधिक तपास पिएसआय भंडारे हे करीत आहेत .
To Top