सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा उपकेंद्र मध्ये असलेल्या ५ एम. व्ही. ए. रोहित्राची क्षमता वाढवून १० एम. व्ही.ए. करणे बाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सासवड महावितरण चे कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
याबाबत सुपे खुर्द ता पुरंदर चे महेश मारुती राऊत यांनी याबाबत मागणी केली होती. खासदार सुळे यांनी दिलेल्या पत्रात म्हणटले आहे की, निरा उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता ५ एम. व्ही.ए. असून सद्य स्थितीत ओव्हरलोड मुळे काही भाग बंद ठेऊन बाकीचा भाग चालू करावा लागत आहे. सदर उपकेंद्राची क्षमता वाढवून १० एम.व्ही.ए. केल्यास निरा व परिसर वाल्हे, पिंपरी, गुळुचे, कर्नलवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, पिसुटर्टी व इतर गावांना उच्च दाबाने विद्युत पुरवठा होईल. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मार्ग निघेल या संदर्भात महेश मारुती राऊत, सदस्य, तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समिती, पुरंदर तालुका यांचे निवेदन आले आहे. कृपया सहकार्य करावे ही विनंती.
---------------
खासदारांच्या हस्तक्षेपा मुळे शेतकऱ्यांना दिलासा गेली अनेक वर्षे निरा गुळुंचे परिसरात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत होता त्यामुळे शेती पंप जळण्याचे प्रमाण खूप वाढले होते ,काही ठिकाणी लो व्होल्टेज मुळे पंप चालत नव्हते या कामी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी कंचन निगडे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले नुकतेच विद्युत वितरण शासकीय समिती अद्यक्ष महेश राऊत यांनी हा प्रश्न खासदार सुप्रिया ताई सुळें याना पत्राद्वारे कळविला यावर खासदारांनी तातडीने या कामी लक्ष वेधुन घेतल्याने शेतकरी आनंदी झाला व सुप्रियाताईंचे ऋण व्यक्त केले अशी भावना कांचन निगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
COMMENTS